Yuvraj Singh: धोनीमुळे मला भारतीय संघातील माझं भविष्य समजलं– युवराज सिंह

Dhoni helped me understand my future in the Indian team says Yuvraj Singh

एमपीसी न्यूज – धोनीने मला खऱ्या अर्थाने माझं भविष्य काय आहे हे सांगितलं. 2019 विश्वचषकासाठी माझा विचार केला जात नाहीये हे त्याने मला समजावून सांगितलं, असे मत भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह यांने व्यक्त केले आहे.

‘न्यूज 18’ या वृत्तवाहिनीशी बोलताना युवराज सिंह यांने माजी कर्णधार धोनी आणि विराट कोहलीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. युवराज म्हणाला, मी ज्यावेळी संघात पुनरागमन केलं त्यावेळी विराटने मला पाठिंबा दिला. त्याचा पाठिंबा नसता तर मी पुनरागमन करुच शकलो नसतो.

पण धोनीने मला खऱ्या अर्थाने माझं भविष्य काय आहे, हे सांगितलं. 2019 च्या विश्वचषकासाठी माझा विचार केला जात नाहीये हे त्याने मला समजावून सांगितलं. त्याला जेवढं शक्य होतं, तेवढी मदत त्याने मला केली.

युवराज पुढे म्हणाला, 2015 च्या विश्वचषक दरम्यान मी आजारपणातून सावरत होतो. खेळ बदलला होता आणि सर्वच गोष्टी बदलल्या होत्या. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यात थोडा वेळ जाणार होता हे मला माहिती होतं. म्हणून 2015 साली मला संघात स्थान मिळालं नाही. यासाठी मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही.

2011 विश्वचषकापर्यंत धोनीला माझ्यावर विश्वास होता. तू माझा महत्वाचा खेळाडू आहेस असं तो मला म्हणायचा. त्यामुळे कर्णधार या नात्याने तुम्ही कधीकधी प्रत्येक गोष्टीचं कारण देऊ शकत नाही. कारण सरतेशेवटी देशासाठी खेळत असताना संघ कशी कामगिरी करतो, हे देखील महत्वाचं आहे असे तो म्हणाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.