Dighi : दिघी आळंदी रोडवर जाळपोळ

एमपीसी न्यूज – दिघे आळंदी रोडवर (Dighi) बॅनर आणि टायरची जाळपोळ करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 30) सायंकाळी बनाचा ओढा येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिघी आळंदी रोडवर सोमवारी सायंकाळी काही नागरिकांनी बॅनर आणि टायर जाळले. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जाळपोळ करणारे नागरिक घटनास्थळावरून निघून गेले होते. त्यामुळे ही जाळपोळ नेमकी कोणी केली याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही.

Akurdi – आकुर्डीत मराठा समाजाच्या आंदोलनाला बौद्ध समाजाचा पाठिंबा

दरम्यान, रस्त्यावर झालेल्या जाळपोळीमुळे वाहतूक काही काळ खोळंबली. बॅनर आणि टायर बाजूला केल्यानंतर वाहतूक (Dighi) सुरू करण्यात आली. यामुळे वाहनांच्या काही अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.