Dighi Crime : ज्ञानदीप बालगृहातून 16 वर्षीय विद्यार्थी गेला पळून

एमपीसी न्यूज- दिघी (Dighi Crime) येथील ज्ञानदीप बालगृहातून 16 वर्षीय विद्यार्थी पळून गेला. ही घटना शनिवारी (दि. ८) दुपारी घडली.
याप्रकरणी ज्ञानदीप बालगृहाच्या अधीक्षक यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्शनगर, दिघी येथे असलेल्या ज्ञानदीप बालगृहात फिर्यादी या अधीक्षक म्हणून काम करतात. शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या बालगृहातून 16 वर्षीय एक विद्यार्थी पळाला. त्याला अज्ञाताने पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास (Dighi Crime) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.