Dighi : माहेरहून फर्निचर आणि गाडी आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून फर्निचर आणि गाडी आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच विवाहितेच्या इच्छेविरोधात तिचा गर्भपात केला. ही घटना आळंदी येथे घडली.

पती विक्रांत थोरात (वय 28), सासू उज्वला राजेंद्र थोरात (वय 45), आजी सासू कमल लक्ष्मण ढमढेरे (वय 65), मामे सासरे उमेश लक्ष्मण ढमढेरे (वय 40), मावस सासू लीना विजय पोळ (वय 42) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून मे 2018 ते मार्च 2019 या कालावधीत पीडित विवाहितेला माहेरहून फर्निचर आणि गाडी आणण्याची मागणी केली. तसेच यावरून सर्वानी मिळून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेच्या इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात केला. तिला शिवीगाळ करून मारहाण केली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलिसात धाव घेतली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.