Diwali celebration : डी.ई.एस. पूर्व प्राथमिक शाळेत वसुबारस, दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज – वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिपावली.(Diwali celebration) यानिमित्त, शुक्रवारी टिळक रोड वरील डी.ई.एस. पूर्व प्राथमिक शाळेत वसुबारस व दीपोत्सव साजरा करण्यात आला.

आजच्या उपक्रमाचे आकर्षण म्हणजे वात्सल्याचे, उदारतेचे, समृद्धीचे प्रतीक म्हणजे प्रत्यक्ष गाय वासरू शाळेत आणण्यात आले होते. त्याची माहिती देण्यात आली. मुले,पालक, शिक्षकांनी हौसेने गायीची पूजा केली. या निमित्ताने शाळेत मुलांनी रंगवलेल्या पणत्या प्रज्वलित करून आकर्षक रांगोळी काढून त्यावर लावल्या होत्या.

Health department recruitment : पुणे झेडपीच्या आरोग्य विभागात 801 जागांची भरती

आकर्षक दिव्याची रोषणाई केली होती. तसेच दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व समजवून सांगण्यात आले होते. मुलांचा आवडता किल्ला बनवण्यात आला होता.(Diwali celebration) सर्व मुलांना पी पी टी द्वारे दिवाळ सणाची माहिती सांगण्यात आली. त्यांच्याकडून तयार करण्यात आलेले आकाशकंदील, पणत्या, शुभेच्छा कार्ड याचे वाटप केले. सर्व वातावरण मंगलमय झाले होते. मुलांना खाऊ व फराळाचे पदार्थ  देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. हा सर्व उपक्रम माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली उत्साहाने पार पडला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.