_MPC_DIR_MPU_III

Pimpri : नेहरूनगर परिसरात ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज – पिंपरीमधील नेहरूनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांची अनेक कामे यामुळे रखडली आहेत.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

नेहरूनगर येथील स्थानिक नागरिक समीर पाटील यांनी सांगितले की, गुरुवारी (दि. 24) सकाळपासून नेहरूनगर परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. याबाबत महावितरणकडे तक्रार केली आहे. परिसरातील वायर बदलावी लागणार असल्याचे महावितरणच्या कर्मचा-यांकडून सांगण्यात येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक अडचणी येत आहेत.

महावितरणच्या कर्मचा-यांनी दोन दिवस झाले तरी वायर बदलण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यामुळे गुरुवारी सकाळी खंडित झालेला वीजपुरवठा शुक्रवारी रात्रीपर्यंत सुरळीत झाला नाही. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.