CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

एमपीसी न्यूज – राज्याच्या राजकारणाला गुरुवारी नवे वळण मिळाले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ (CM Eknath Shinde)  घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतेली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या दोन्ही नेत्यांना पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.

दरम्यान, सायंकाळी पाच वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपण सत्तेत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र पुढील दिड तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दोनदा फोन केला आणि त्यानंतर पक्षाचा आदेश म्हणून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

दरम्यान, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रात्री जनतेला संबोधित केल्यानंतर आपल्या मुख्यमंत्री पदाचा तसेच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्त केला होता. आज झालेल्या शपथविधीनंतर गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील राजकीय नाट्यावर पडदा पडला. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपल्या पदाची शपथ घेताना शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रथम उल्लेख केला व त्यानंतर त्यांनी शपथ घेतली.

CM Eknath Shinde

Eknath Shinde Profile : रिक्षाचालक ते मुख्यमंत्री!; एकनाथ शिंदे यांचा नेत्रदीपक जीवनप्रवास

CM Eknath Shinde

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये काम करण्यास प्रथम नकार दिला होता आणि आपण संघटनेत काम करु इच्छितो आणि प्रदेशाध्यक्ष पद संभाळण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांची मागणी नाकारुन त्यांना सरकारमध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला.त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.

CM Eknath Shinde

Maharashtra CM : आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.