Pune District Crime News : धक्कादायक !  वृद्ध नागरिकाची मंदिराच्या गाभार्‍यात गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. बारामती शहरातील वनवे मळा याठिकाणी शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. काशिनाथ सिताराम वनवे (वय 60) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध नागरिकाचे नाव आहे.

वनवे यांचे स्वतःचे विठ्ठल मंदिर आहे. याच मंदिरात ते दररोज सकाळ संध्याकाळ देव पूजा करीत असत. आज सायंकाळी ते नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते. परंतु सायंकाळच्या सुमारास त्यांनी त्याच मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु या घटनेने संपूर्ण बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.