Eng Vs Pak: शेवटचा T20 सामना पाकिस्ताननं पाच धावांनी जिंकला, मालिका 1-1 बरोबरीत

फखर झमान स्वस्तात बाद झाला. बाबर आझमला (21) चांगली सुरूवात मिळाली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही.

एमपीसी न्यूज – पाकिस्तानने इंग्लंड बरोबर कसोटी मालिका 1-0 ने गमावल्यानंतर अखेर पाकिस्तानच्या दौऱ्याचा शेवट गोड झाला. तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना पाकिस्तानने अवघ्या पाच धावांनी जिंकला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी राखली.

पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सावध सुरूवात केली. फखर झमान स्वस्तात बाद झाला. बाबर आझमला (21) चांगली सुरूवात मिळाली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणारा हैदर अली आणि हाफिज यांनी धडाकेबाज खेळी केल्या.

अलीने 33 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावा केल्या. पहिल्याच T20 मध्ये अर्धशतक ठोकणारा तो पहिलाच पाकिस्तानी खेळाडू ठरला. हाफीजने नाबाद राहत 52 चेंडूत 86 धावा कुटल्या. त्यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.

पाकिस्तानने उभ्या दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या गोटातील खेळाडूंनी मोठी भागीदारी करता आली नाही. सॅम बिलिंग्स आणि मोईन अली यांच्यात चांगली भागीदारी झाली, पण मोक्याच्या क्षणी बिलिंग्स बाद झाला. त्याने 26 धावा केल्या. मोईन अलीने 19व्या षटकापर्यंत झुंज दिली. पण अखेर तो 61 धावांवर बाद झाला. अखेर इंग्लंडचा पाच धावांनी पराभव झाला.

सामन्यात पाकिस्तानच्या हैदर अली आणि अनुभवी मोहम्मद हाफिज यांनी अर्धशतके ठोकली. सलग दोन अर्धशतके ठोकणाऱ्या मोहम्मद हाफिजला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.