Pimpri News : आव्हाड हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या; मातंग समाजाची मागणी

एमपीसी न्यूज – औरंगाबाद येथील मागासवर्गीय समाजातील तरुण मनोज आव्हाड याची शुल्लक कारणावरून हत्या केली. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा द्यावी, आव्हाड याच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत करावी अशा मागणीचे निवेदन मातंग समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदन देण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष संजय ससाने, भाजपचे पदाधिकारी मनोज तोरडमल, सुभाष सरवदे, नेताजी शिंदे, किशोर हातागळे ,जयदास साळवे तसेच समाजाचे मातंग समाज समितीचे सागर गायकवाड,किशोर नवघिरे,दीपक चखाले, विकास जगधने, बबन आडागळे,सचिन आडागळे,संतोष ऊल्हारे, जयवंत गायकवाड,अरुण जोगदंड,अमोल कूचेकर,अविनाश कांबीकर, समीर मोरे, भाऊसाहेब अडगळे, कोमल शिंदे,लहुजी शक्ती सेनेचे राजू अवळे,उपस्थित होते.

भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे म्हणाले, अत्यंत वाईट पद्धतीने मनोज आव्हाड या तरुणाची हत्या करण्यात आली. लाईट चोरीचा आरोप त्याच्यावर ठेऊन काठी आणि फावड्याने भर चौकात हात बांधून एकाच कुटुंबातील तरुणांनी त्याची हत्या केली. तो व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये पसरविला.

महाराष्ट्रामध्ये सध्या अत्यंत दहशत तसेच पोलिसांचा वचक नसलेले वातावरण आहे. हत्येच्या प्रमुख सूत्रधारापर्यंत पोचून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच मृत तरुणाच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी. यावर तातडीने कारवाई करावी. अन्यथा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.