Pimpri : संगीत खूर्ची, रक्तदान विविध कार्यक्रमांनी महापालिकेचा वर्धापनदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 37 वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 45 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. 14 कर्मचाऱ्यांनी नेत्रदान करण्याचा फॉर्म भरून दिले. संगीत खूर्ची स्पर्धेत पुरुष गटातून माधव सोनवणे आणि महिला गटातून मनाली राणे यांचा प्रथम क्रमांक आला.

कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, मुख्यलेखापरिक्षक अमोद कुंभोजकर, मुख्यलेखापाल जितेंद्र कोळंबे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे, सह शहर अभियंता मकरंद निकम, वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंदारे, श्रीकांत सवणे,  उपअभियंता माधव सोनावणे, महानगरपालिका कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

क्रीडा विभागातर्फे संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये माधव सोनावणे यांना पहिला, सुरेश साळुंखे यांना दूसरा तर तिसरा क्रमांक प्रशांत जोशी यांना मिळाला. तर, महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत मनाली राणे यांना पहिला, उज्वला गोडसे यांना दूसरा तर तिसरा क्रमांक सुप्रिया सुरगुडे यांना मिळाला.

वैद्यकीय विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये 45 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच नेत्रदान स्वीकृती फॉर्म देखील स्वीकारण्यात येत होते. त्यात 14 कर्मचाऱ्यांनी नेत्रदान करण्याकरीता फॉर्म जमा केले. प्लॅस्टीक मुक्तीसाठी आणि विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करण्याची शपथ आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्वांना दिली. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.