Pune : दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीवर गोळीबार ; पतीला अटक

एमपीसी न्यूज – दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीच्या दिशेने गोळी झाडणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने पत्नीला गोळी न लागल्याने ती थोडक्यात बचावली. ही घटना काल शुक्रवारी (दि.12) दुपारी एकच्या सुमारास तडीवाला रोड येथील सरस्वती सोसायटीमध्ये घडली.

याप्रकरणी आरोपीचा मुलगा योगेश चाथे (वय 24) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बालाजी रंगनाथ चाथे(वय 46) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील बालाजी यांना त्यांच्या पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्यामुळे त्यांनी कंबरेला असलेला रिव्हॉल्वर काढून आपल्या पत्नीच्याच दिशेने ती गोळी झाडली सुदैवाने ती गोळी पत्नीला न लागल्याने ती थोडक्यात बचावली. घडलेला सर्व प्रकार आरोपीच्या मुलाने पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितला व घटनास्थळी तात्काळ जाऊन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.