Vadgaon Maval : बंडातात्या कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह विधान केले. यांचा मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी निषेध व्यक्त केला आहे तसेच या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भेगडे यांनी मावळचे नायब तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

यावेळी बबनराव भेगडे यांच्यासह मावळ तालुका ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष सुभाष जाधव, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, नगरसेवक राजेंद्र कुडे, चंद्रजीत वाघमारे,भाऊसाहेब ढोरे, आशिष बन्सल, उमा शेळके, पुजा खराडे, आरती घारे, मंगेश खैरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर गुरूवार (दि 3) रोजी सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ह्या लोकनेत्यांवर बंडातात्या कराडकर यांनी बेताल वक्तव्य केलं त्याबद्दल मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

भेगडे पुढे बोलताना म्हणाले, बंडातात्या कराडकर हे एक वारकरी आहेत. एका कीर्तनकाराने महिलांवर घसरावं अशी महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नाही. तरी बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायाची शाल पांघरून सतत आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात तसेच भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून बंडातात्या कराडकर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार श्री चाटे साहेब यांना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.