Moshi News : मोशी येथे एका स्टॉलला आग

एमपीसी न्यूज – मोशी येथे एका स्टॉलला शुक्रवारी पहाटे  आग लागून सर्व साहित्य खाक झाल्याची घटना घडली आहे.

 

याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चिखली कार्यालयाने सांगितले की पुणे – नाशिक महामार्गावरील मोशी पोलीस चौकीजवळ आज पहाटे 2.15 च्या सुमारास एका वडापावच्या स्टॉलला आग लागली होती.एक अग्निशमन बंब  2.22 वा तेथे पोहचून आग विझवण्यात आली.परंतु या आगीत स्टॉलचे सर्व साहित्य जळून खाक झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.