Vadgaon Maval : दोन गटातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेल मध्ये दोन गटात भांडण सुरू होते, हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर एकाने गोळीबार केला. यामध्ये उपनिरीक्षकाच्या मांडीला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री बाराच्या सुमारास साते येथील हॉटेल फ्लेवर्स फॅमिली रेस्टॉरंट येथे घडली.

दादा बाळू ढवळे (वय 38, रा. पुनावळे, ता. मुळशी), सुनील विलास पालखे (वय 27), संतोष उर्फ बिट्या बाळासाहेब गायकवाड (वय 21, दोघे रा. जांबे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर गोळीबार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साते येथील हॉटेल फ्लेवर्स फॅमिली रेस्टॉरंटच्या पार्किंग मध्ये मनोज सिद्धाया तेलगू (वय 29, रा. देहूरोड) आणि त्याचे मित्र यांचे आरोपींशी भांडण झाले. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मोहिते घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी दादा हा टॉयलेटमध्ये होता. त्याच्याकडे शस्त्र असल्याचे समजल्याने मोहिते त्याला ताब्यात घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी आरोपीने त्याच्या कमरेला लावलेल्या पिस्तुलने मोहिते यांच्यावर गोळीवर केला. त्यात मोहिते यांच्या मांडीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मोहिते यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचा-यांनी आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. यांच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले. आरोपींवर खुनाचा प्रयत्नचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.