Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात पाच दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरी ही नित्याची बाब झाली आहे. घरासमोर, बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये, दुकानासमोर तसेच अन्य कुठेही लावलेली वाहने चोरटे चोरून नेत आहेत. शनिवारी (दि. 27) पिंपरी-चिंचवड शहरात पाच दुचाकी चोरीला गेल्या. याबाबत पिंपरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात खलील शमशुद्दीन शेख (वय 33, रा. गंजपेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली. शेख यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 12 / जी एल 9194) पिंपरी मधील रेल्वे ओव्हर ब्रिज शेजारी असलेल्या क्रोमा शाॅप समोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

पिंपरी पोलीस ठाण्यात आणखी एक दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशांत रामराव शिंदे (रा. संतनगर मोशी) यांनी फिर्याद दिली. प्रशांत यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 10 / क्यू 5117) संत तुकारामनगर येथील इंजीनियरिंग कॉलेज समोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनुषा शशिकांत जोशी (वय 24, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली. त्यांची 20 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 13 / सी ई 0163) घरासमोर पार्क केली. त्यांच्या ओळखीचा मुलगा सुकृत कालीचरण जोशी (वय 29, रा. कात्रज) याने बनावट चावीच्या सहाय्याने अनुषा यांच्या संमतीशिवाय चोरून नेली.

अनिता विठ्ठल काळे (वय 46 रा. रुपीनगर तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनिता यांची दुचाकी (एम एच 14 / ई एफ  8784) त्यांचा मुलगा सोनू काळे याने तळवडे येथील सौदामिनी हॉटेलच्या समोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने दुचाकीचे लाॅक तोडून गाडी चोरून नेली.

हिंजवडी पोलीस ठाण्यात महादेव भागवत डांगे (वय 28, रा. भुमकर वस्ती वाकड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव यांची 20 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 13 / सी ए 8071) त्यांच्या दुकानासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलचे लोक तोडून मोटारसायकल चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.