गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Maval News : कुसगाव बुद्रुक येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन

एमपीसी न्यूज – भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्ताने कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्यावतीने अनोखा उपक्रम करण्यात आला.यावर्षी दहावी व बारावीमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना झेंडा फडकवण्याचा मान देण्यात आला व ग्रामपंचायतीने आपलं वेगळेपण सिद्ध केले आहे.

कुसगाव बुद्रुक येथील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालय येथे सई आनंद गावडे, जिल्हा परिषद शाळा कुसगाव बुद्रुक येथे तृप्ती किशोर परदेशी, जिल्हा परिषद शाळा ओळकाईवाडी येथे साहिल सुधीर मुळीक,क्रांतीनंतर अंगणवाडी येथे दक्ष पाटील अशा एकूण चार ठिकाणी चार विद्यार्थ्यांनी झेंडावंदन केले. विद्यार्थी हा मान मिळवण्यासाठीअथक परिश्रम घेतले व सर्वाधिक गुण मिळवतील असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

या प्रसंगी सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच सूरज दत्ता केदारी, सर्व सदस्य, ग्रामपंचायतकर्मचारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या वर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी संपूर्ण गावात २००० तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले होते .

spot_img
Latest news
Related news