Talegaon News : भाजपच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. पक्ष कार्यालयात शहर अध्यक्ष रवींद्र माने यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी अटलजी यांच्या कार्याचा आढावा शहराध्यक्ष रवींद्र माने, मार्गदर्शक अरुण भगवान भेगडे यांनी घेतला. तसेच भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान योजनेची सदस्य नोंदणी सुरु करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयां सोबत संवाद कार्यक्रम पक्ष कार्यालयामध्ये पाहण्यात आला.

यावेळी प्रभारी वैभव कोतुळकर, नगरसेवक अरुण भेगडे (पाटील), नगरसेविका शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, माजी नगरसेवक सचिन टकले,सरचिटणीस शोभा परदेशी, विनायक भेगडे, महिला आघाडी अध्यक्षा (स्टेशन विभाग) अंजली जोगळेकर,महिला आघाडी अध्यक्षा (गाव विभाग) मोहिनी भेगडे तसेच सर्व आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.