Maval News: दुर्मीळ घोरपडीला वन्यजीव रक्षक मावळ संस्‍थेच्या सदस्यांनी केले रेस्क्यू 

एमपीसी न्यूज: दुर्मिळ घोरपडीला वन्यजीव रक्षक मावळ संस्‍थेच्या सदस्यांनी रेस्कयू केल्याची घटना वडगाव नवल शहरात घडली आहे.(Maval News) या घोरपडीला सुरक्षितपणे रेस्क्यू करून वन विभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी घोरपडीला लगेच निसर्गात सोडून दिले.

26 ऑगस्टला सकाळी स्वप्नील आंबेकर यांनी फोन करून सांगितले की, एक घोरपड महिंन्द्रा ट्रॅक्टरच्‍या शोरूम बाहेर रोडच्या कडेला विटांच्या ढिगामध्ये आहे. अशी महिती त्‍यांनी जिगर सोळंकी यांना दिली. त्यांनी लागेच ती महिती वन्यजीव रक्षक मावळ संस्‍थेचे संस्‍थापक अध्यक्ष नीलेश गराडे यांना दिली.(Maval News) वेळ न घालवता संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे आणि जिगर सोळंकी यांनी त्या ठिकाणी गेले. त्यांनी घोरपडी ला सुरक्षितपणे रेस्क्यू करून पुणे वन विभागाच्या वडगाव वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना कळवले.

Women Molestation: महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण

घोरपडीला वाचवल्या नंतर त्या ठिकाणी जिगर सोलंकी यांनी लोकांमध्ये जनजागृती केली. त्यांनी सांगितले की, घोरपड  निसर्गाचा भाग असून आपण त्याला निसर्गामध्ये राहू दिले पाहिजे. असे सांगून त्या घोरपडीची प्राथमिक तपासणी करुन तिला काही जखम नसल्याचे कळाले. (Maval News) त्यामुळे वन विभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य यांनी घोरपडीला लगेच निसर्गात सोडून दिले. तसेच कुठेही वन्य प्राणी साप किंवा कुठलेही प्राणी घरात किंवा लोक वस्तीमध्ये दिसल्यास पुणे वन विभाग पुणे टोल फ्री नंबर (1926) यांना फोन करा. काही वेळात आपल्याला नक्कीच मदत मिळेल, असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश गराडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.