Fraud Case: मेल आयडी हॅक करत कंपनीच्या मालकिणीची 54 कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज : इकोकप इंडिया पेपरकप प्रा. लि. कंपनीच्या मालकिणीचा ई-मेल आयडी हॅक करून त्यावरून मेल करत कंपनीची तब्बल 54 कोटी 39 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Fraud Case) हा प्रकार 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत नवलाख उंब्रे येथील इकोकप इंडिया पेपरकप प्रा. लि. येथे घडला.

सुशील भीमराव गडलिंग (वय 46 , रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Women Molestation: महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीच्या मालकीण अॅनालिसा फेरी यांचा मेल आयडी अज्ञाताने हॅक केला.(Fraud Case) अॅनालिसा फेरी यांच्या मेलवरून फिर्यादी यांना मेल पाठवून गोलप बुबू सिंग इंटरप्राईजेस, मोहम्मद जुवेर इंटरप्रायजेस, सुरजसिंग इंटरप्रायजेस यांच्या अकाउंटवर रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले. याद्वारे आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीची 54 कोटी 39 लाख 57 हजार 49 रुपयांची फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.