Pune corona update: हळूहळू पुणे पूर्वपदावर, शहरात  अवघे तीन हजार सहाशे सक्रिय रुग्ण 

Gradually, Pune on the pre-position, only three thousand six hundred active patients in the city.

एमपीसी न्यूज- पुण्यात आज नवे २९७ रूग्ण सापडले तर ५२९ रूण बरे होऊन घरी गेले. शहरातील ॲक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या तीन हजार सहाशेवर आली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पुण्यातील हाताबाहेर गेलेली परिस्थिती आता रूळावर आली असून काही बंधनांसह पुण्यातील दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत.

पुण्यातील  कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 72 हजार 728 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये 12 रुग्ण शहरातील आहेत तर 12 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 422 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात 3 हजार 699 रुग्ण सक्रीय आहेत.

दरम्यान 529 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 60 हजार 607 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5 हजार 052 स्वॅब तपासणी करण्यात आली.

आज पर्यंत शहरात 25 लाख 48 हजार 825 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 589 रुग्ण गंभीर आहेत. तर 1178 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.