Pimpri : क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे व अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.