Hadapsar : पत्नीचा त्रास, पतीचा गळफास; पत्नीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यात पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या (Hadapsar) त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणी पत्नीसह तिच्या नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अभय संजीवराव गवळी (वय 41, रा. भंडलकरनगर, शेवाळवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अभय गवळी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी पत्नी तृप्ती, सासू, जालिंदर आंबवडे, संतोष आंबवडे, आणि एक महिला (रा. कुंजीरवाडी, लोणी काळभोर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभय गवळी यांचे भाऊ सतीश (वय 43, रा. मासुळकर काॅलनी, पिंपरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : उद्यान विभागातर्फे उद्या सीड बॉल्स कार्यशाळा

अभय यांचा नऊ वर्षांपूर्वी तृप्ती हिच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर (Hadapsar) त्यांच्यात वाद सुरू झाले. वादातून तृप्ती आणि तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी अभय यांना त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरकडील नातेवाईकांचा संसारात हस्तक्षेप वाढल्याने अभय यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.