Sangvi : निवडणुकीचा खर्च करण्यासाठी पैसे न दिल्याने तसेच बीएमडब्ल्यू कारसाठी भाजप नगरसेविकेकडून सुनेचा छळ? 

एमपीसी न्यूज – निवडणुकीत खर्च करण्यासाठी पैसे न दिल्यावरून तसेच सुनेकडे बीएमडब्ल्यू कारची मागणी करत भाजप नगरसेविकेने सुनेचा छळ केला असल्याची फिर्याद सुनेने सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेविकेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेविका सासू आरती सुरेश चोंधे, पती संकेत सुरेश चोंधे, दीर विनय सुरेश चोंधे (सर्व रा. पिंपळे गुरव), सासूचा भाऊ किशोर निम्हण (रा. सकाळ नगर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय सुनेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 एप्रिल 2016 ते 26 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली आहे. सुनेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी फिर्यादीकडे बीएमडब्ल्यू कार मागितली. लग्न झाल्यानंतर निवडणुकीकरिता खर्च करण्यासाठी पैसे दिले नाही. तसेच फिर्यादी त्यांच्या घरात राहण्याच्या लायकीची नाही, असे म्हणून वेळोवेळी अपमान केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.