Pimpri : मेट्रोच्या लेबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती; महापालिकेने ठोठावला 15 हजारांचा दंड

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोच्या नाशिक फाटा चौकाजवळील कॉस्टींग यार्डमधील लेबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने महामेट्रोच्या एन. सी. सी. या ठेकेदार कंपनीस 15 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

महामट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरात पुणे-मंबई जन्या महामार्गावरील दापोडीच्या हरिस पूल ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेट अशा 7.50 किलोमीटर अंतरावर काम सरू आहे. मेट्रो स्पॅनसाठी सेगमेंटची निर्मिती नाशिक फाटा चौकाजवळील पिंपळेगुरव येथील कास्टींग यार्ड येथे केली जात आहे. याच ठिकाणी मेट्रोचा लेबर कम्प आहे. त्या ठिकाणी तपासणी केली असता डास उत्पत्ती होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागास आढळून आले.

त्यामुळे महापालिकेच्या पथकाने महामेट्रोच्या एनसीसी या ठेकेदारास 15 हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच डास उत्पत्ती होणार नाही. याची दक्षता घेण्याचे सक्त निर्देश बजावण्यात आले आहेत. याच कॉस्टींग यार्डमधन राडारोडा पवना नदी पात्रात टाकला जात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर महापालिकेने व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने महामेट्रोला नोटीस बजावली होती. त्यामुळे महामेट्रोने तातडीने नदीपात्रात टाकलेला राडारोडा काढून घेतला होता. तसेच, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली होती.

शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे साहित्य पडून मेट्रोच्या कामासाठी दापोडी ते चिंचवडपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साहित्य पडून आहे. बॅरिकेट्स, लोखंडी सांगा फ्रेम, खांब, साहित्य ठिकठिकाणी अनेक महिन्यांपासून पडून आहेत. तसेच, मेट्रोने अनेक ठिकाणी खड्डे घेतले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून डास उत्पत्ती होत आहे. त्यामुळे त्या भागांतील रहिवाशी, वाहनचालक आणि मेट्रोच्या कामगारांना डास चावून विविध आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मोठ्या संस्थांनी जबाबदारीने वागावे – डॉ. रॉय

डास निर्मुलन कार्यक्रमा अंतर्गत शहरात तपासणी मोहीम सुरु आहे. बांधकाम व हॉटेल व्यावसायिकांना यापूर्वी 5 ते 10 हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे. पिंपळेगुरव येथील कॉस्टींग यार्डमधील लेबर कॅम्पमध्ये याच अंतर्गत तपासणी करण्यात आली. यामध्ये लेबर कॅम्पमध्ये डास उत्पत्ती ठिकाणे आढळून आली. त्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला. त्यांना या प्रकरणी सक्त ताकीद करण्यात आली. अनेकजण एकत्र काम करणाऱ्या, मोठ्या संस्थांनी यामध्ये जबाबदारीने वागले पाहिजे, असे आरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.