Pimpri : शेखर ओव्हाळ युवा मंचतर्फे पूरबाधितांसाठी आरोग्य शिबिर

पहिल्याच दिवशी 600 जणांची तपासणी

एमपीसी न्यूज – शेखर ओव्हाळ युवा मंच, पवना मेडिकल फाउंडेशन आणि पवना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पूरबाधितांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 9) शिबिराच्या पहिल्याच दिवशी सुमारे 600 जणांची तपासणी झाली.

शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व पिंपरी विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार शेखर ओव्हाळ, नगरसेवक रोहीतअप्पा काटे, मगरभाई  शेख, लतीफ सैय्यद, योगेश अहिवळे, बंटी मुजावर, सुशांत भंडारी, मझहर शेख, सुशांत केंजळे, अनिल हुलावळे, संदिप गोजगे, परिमल कडलक, रितेश ओव्हाळ, अमोल जावळे, केवळ शिंदे, स्वप्नील शिंदे, मुन्ना ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीसह शेखर ओव्हाळ युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी यासह अन्य भागात काही दिवसांपूर्वी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. घरा -घरांत पाणी शिरून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अन्य गैरसुविधांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. त्यामुळे आजारी पडण्याचा प्रकार वाढू लागला. या पार्श्वभूमीवर शेखर ओव्हाळ युवा मंचने पुढाकार घेऊन आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.

या शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर यासह सामान्य तपासणी करण्यात आली. तसेच तपासणी केलेल्या  शिबिराला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. या वेळी रुग्णांवर तपासणी केल्यानंतर लगेचच त्यांना मोफत औषध देण्यात आली. हे शिबीर आणखी 10 दिवस चालणार असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शेखर ओव्हाळ यांनी केले. शिबिरासाठी पवना हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद निकम, डॉ. अभिषेक लाड, डॉ. प्रीती हजारे, डॉ. निपुण जाधव यांचे पथक कार्यरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.