Hinjawadi crime :  निलंबित पोलीस असल्याचे सांगत हिंजवडीत  पी.जी. मालकालाच मारहाण

एमपीसी न्यूज : निलंबित पोलीस असल्याचे सांगत रूमच्या (पी.जी.) मालकालाच मारहाण करण्यात आल्याची घटना हिंजवडी येथे घडली आहे.(Hinjawadi crime) हा प्रकार जानेवारी 2022 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत नक्षत्र पीजी नारायण नगर हिंजवडी येथे घडला.

साजिद मन्सूर पेंढारी (वय 23, रा. नक्षत्र पीजी, नारायण नगर, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल नामदेव राठोड (वय 29, रा. परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नारायण नगर, हिंजवडी येथे एकवीरा पीजी चालवितात. तिथे राहत असलेला मुलगा विकी चव्हाण याची फिर्यादी सोबत ओळख झाली.(Hinjawadi crime) विकी याने फिर्यादी यांना त्याचा मामा आरोपी राहुल राठोड याच्यासोबत ओळख करून दिली. जानेवारी 2022 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत आरोपीने वेळोवेळी, मी पोलीस खात्यामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार पदावर नोकरी करत होतो.

Rayat Vidyarthi Parishad : रस्ते साफसफाईच्या निविदेत 200 कोटींचा घोटाळा, दोषींवर गुन्हे दाखल करा

मी पोलीस स्टेशन हाऊस इन्चार्ज होतो. आमच्या ताब्यात एक आरोपी होता. तो लॉकअप मध्ये असताना मेला. माझ्यावर डेथ इन कस्टडी झाली. मला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले. त्यामुळे मी हिंजवडी येथे नोकरीसाठी आलो आहे, असे भासवून विनाकारण फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली.(Hinjawadi crime) तसेच फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली. पोलिसांची पिंजऱ्याची गाडी बोलावून तुला जेलमध्ये टाकतो, असे बोलून पोलिसांची भीती दाखवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.