Chakan crime : चोरट्यांनी देशी दारूच्या गोडाऊनवर मारला डल्ला  

एमपीसी न्यूज : चोरट्यांनी थेट देशी दारूच्या गोडाऊनवर डल्ला मारला असून गोडाऊन मधून  6 लाख 33 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.(Chakan crime) ही घटना शनिवारी (दि. 3) दुपारी चार ते रविवारी (दि. 4) सकाळी साडेअकरा वाजताच्या कालावधीत घडली.

अशोक रामचंद वलेषा (वय 59, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi news : आळंदी येथील मूर्ती संकलित केंद्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे होलसेल देशी दारू विक्रेते आहेत. त्यांचे मेदनकरवाडी मधील गवते वस्ती येथे गोडाऊन आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोडाऊनच्या गेटचा कडीकोंडा तोडून शटर उचकटून आत प्रवेश केला.(Chakan crime) गोडाऊन मधून 224 देशी दारूचे बॉक्स आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, तसेच एक कॅमेरा असे एकूण सहा लाख तेहतीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.