Hinjawadi Crime News : सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मिळेल त्या गॅस एजन्सी मधून भरलेले सिलेंडर आणून त्यातून चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस चोरून काढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने रविवारी (दि. 8) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील रसिकवाडी जांभे येथे ही कारवाई केली.

आकाश अशोक म्हेत्रे (वय 22, रा. रहाटणी काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक जालिंदर गारे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश याने मिळेल त्या गॅस एजन्सी मधून अतिप्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवला. त्यानंतर धोकादायकरित्या एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता गॅस चोरी केला. आरोपी आकाशने भरलेल्या गॅस सिलेंडर टाक्यांमधून चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस काढून घेत चोरी केली. पोलिसांनी कारवाई करत गॅस रिफील नाॅझ, शार्प कंपनीचा वजन काटा असा एकूण 64 हजार 814 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.