Hinjawadi : गांजा बाळगल्या प्रकरणी हिंजवडी, पिंपरीत दोन कारवाया

एमपीसी न्यूज – हिंजवडी आणि पिंपरी (Hinjawadi) परिसरात गांजा बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोन कारवाया केल्या. हिंजवडी येथे 56 हजार 500 तर पिंपरीत 150 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

योगेश वसंतराव पोकळे (वय 36, रा. मारुंजी, ता. मुळशी) याला हिंजवडी येथील कारवाईत अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक अजित कुटे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

योगेश पोकळे याने त्याच्याकडे गांजा बाळगला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (दि. 31 मे) दुपारी चार वाजता कासारसाई रोड मारुंजी येथे कारवाई करून योगेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा हजार 500 रुपये किमतीचा 260 ग्रॅम गांजा, एक दुचाकी असा एकूण 56 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

Talegaon News : पुण्याहून ठाण्याला निघालेल्या प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

तुळसीदास गटोले कुशवाह (वय 21, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) याला पिंपरी येथील कारवाईमध्ये अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शांताराम हांडे यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी तुळसीदास (Hinjawadi) हा मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भाटनगर येथील सरकारी दवाखान्याच्या कंपाउंडजवळ गांजा ओढत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून 12 ग्रॅम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य असा एकूण 150 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.