Rahul-Sonia ED Notice: राहुल व सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस; आठ जूनला चौकशी

एमपीसी न्यूज – नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसुली संचनालयाने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहु lल गांधी यांना समन्स बजावले आहे.सोनिया गांधी यांना आठ जून रोजी चौकशीसाठी (Rahul-Sonia ED Notice) बोलविण्यात आले आहे.

 

काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, आम्ही झुकून सामना करणार नाही.सोनिया गांधी स्वत:ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.गांधी परिवाराविरोधात ईडीने समन्स बजावल्यानंतर राजकीय प्रतिक्रीया येत आहेत. पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांनी याबाबत भाष्य केले आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांना नोटीस पाठविली आहे. पण आम्ही घाबरणार नाही,झुकणार नाही— छाती ठोकून लढणार. यापुर्वी ईडीने हे प्रकरण बंद केले होते. भाजपचा राजकीय विरोधकांना धमकाविण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी तपास यंत्रणांचा वापर करत आहेत, असा आरोप अभिषेक मनू संघवी यांनी केला.

 

यापुर्वी १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांनी नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. त्याच्याकडून आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर (Rahul-Sonia ED Notice) चौकशी करण्यात आली.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडीया लि.माध्यमातून ते चुकीच्या पध्दतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी दोन हजार कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता.यंग इंडीया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापना करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.