Hinjawadi : ‘शिवनेरी बस’च्या धडकेत महिलेचा मृत्यू; बसचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शिवनेरी बसने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 19) दुपारी साडेबाराच्या सुमारास वाकड ब्रिजजवळ सूर्या हॉस्पिटल समोर झाला.

अश्विनी तानाजी मुरुडकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर, तानाजी पोपटराव मुरुडकर (वय 28, रा. भोसरी) हे या अपघातात जखमी झाले आहेत. तानाजी यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालक रवींद्र विठ्ठल जाधव (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी फिर्यादी तानाजी आणि त्यांच्या मयत पत्नी अश्विनी हे दोघेजण एम एच 12 / ई डी 28 49 या दुचाकीवरून देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून जात होते. ते वाकड ब्रिजजवळ आले असता त्यांच्या मागून भरधाव वेगात आलेल्या शिवनेरी बसने त्यांना धडक दिली. यामध्ये तानाजी एक गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या पत्नी अश्विनी यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.