Hinjawadi : हिंजवडी पोलिसांनी केला 15 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी (Hinjawadi) एका टेम्पो मधून 15 लाख 95 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हि कारवाई शनिवारी (दि.25) भुगाव येथे करण्यात आली आहे.

 

याप्रकऱणी रामलाल चौघाजी चौधरी (वय 45 रा. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Chinchwad : बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत दिड लाखांची फसवणूक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या टेम्पो मधून (एमएच 12 यु.एम 9314) विषारी गुटखा घेऊन जात असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात (Hinjawadi) घेत त्याच्याकडून 15 लाख 95 हजार 288 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.यावरून हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.