Crime News : लॅच तोडून तीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – प्राधिकरण चिखली येथे दरवाज्याचे लॅच तोडून चोरट्याने घरातून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण तीन लाख पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.6) दुपारी राजे शिवाजीनगर येथे उघडकीस आली.

नितीन धोंडीराम फडतरे (वय 42, रा. राजे शिवाजीनगर प्राधिकरण चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण सविता दशरथ शिंदे यांचे घर 29 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या

कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्यांच्या घराच्या दरवाज्याचे लॅच चोरट्यांनी तोडले आणि घरात प्रवेश करून घरातील सोन्याचांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण तीन लाख पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.