Khadaki : हातगाडी चालकाजवळील 70 हजाराची रोख रकम पळवली

एमपीसी न्यूज – खडकी येथे हातगाडीवर पर्स विक्री करणा-या इसमाला बोलण्यात गुंतवून त्याच्या हातगाडीवरील 70 हजार रुपयांची रोख रकमेची पर्स आणि मोबाईल पळवली. ही घटना सोमवारी (27) रात्री सव्वानऊ च्या सुमारास कल्पेश ज्वेलर्स समोर सार्वजनिक रोडवर घडली.
या प्रकरणी अनिल इंगळे (वय 48, रा. खडकी, पुणे), याने फिर्याद दिली.

अनिल टिकाराम चौकमध्ये हातगाडीवर पर्स विक्रीचा व्यवसाय करतो. सोमवारी रात्री अज्ञात इसमाने अनिला यांना तुमच्या शर्टावर घाण पडली आहे, असे सांगत त्यांचा शर्ट साफ करीत असताना, त्याचे लक्ष विचलित केले. संधी साधून हातगाडीवरील 70 हजार रुपये रोख रकम असलेली पर्स आणि मोबाई चोरून नेला.

अनिल यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून खडकी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.