Marital harassment : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पतीला डायबेटिज (Marital harassment) आजाराचे निदान झाल्यानंतर त्याने काम करणे बंद केले. तसेच विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. तिच्याकडून लाखो रुपये घेऊन तिचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला. या प्रकरणी पती आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर 2018 ते 24 मे 2022 या कालावधीत चिखली येथे घडला.

पती अनुप मोहन (वय 37, रा. चिखली), सासरे मोहनन (वय 64, रा. केरळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dighi News : दोन महिलांचा ऑनलाईन माध्यमातून पाठलाग करत बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पतीसोबत नांदत असताना पतीला डायबेटिज आजाराचे निदान झाले. तेव्हापासून ‘मी कामाला जाणार नाही. तू कामाला जायचं. माझा व माझ्या वडिलांचा खर्च तूच करायचा’ असे म्हणून फिर्यादींसोबत वेळोवेळी पतीने भांडण केले. टोचून बोलून, अपमान करत हाताने मारहाण केली.

सासरे यांनी गावी शेळीपालन व्यवसाय करायचा असल्याचे (Marital harassment) सांगून पैशांची मागणी केली. फिर्यादीकडून वेळोवेळी दोन लाख रुपये घेतले. पती आणि सासऱ्याने गावी काढलेले कर्ज फेडण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे 21 लाख रुपयांची मागणी केली. तसेच कार विकत घेऊन देण्याचीही आरोपींनी मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.