Wakad: पती-पत्नीच्या भांडणात दोन मध्यस्थांकडून पतीला मारहाण

Husband beaten by two mediators in marital quarrel in wakad

एमपीसी न्यूज- पती-पत्नीचे भांडण सुरू असताना दोन मध्यस्थांनी पतीला दगडाने मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे दि. 26 मे रोजी घडली. याबाबत 31 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेश्‍मा गोरखनाथ खुडे (रा. मंगलमूर्ती वाड्याजवळ, चिंचवडगाव) आणि संतोष झांबरे (रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष सिताराम आरसकर (वय 35, रा. पडवळनगर, थेरगाव) असे जखमी झालेल्या पतीचे नाव असून त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी शिल्पा पतीला न सांगता तिची मानलेली बहिण आरोपी रेश्‍मा हिच्याकडे गेली.

या कारणावरून 26 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांनी पत्नी शिल्पा हीला थेरगाव येथे बोलविले. त्यांच्यामध्ये बोलणे सुरू असताना आरोपी रेश्‍मा हिने आरसकर यांना रस्यावर पडलेल्या दगडाने मारहाण केली.

तसेच आरोपी झांबरे याने नाकावर बुक्‍की मारून हाड फ्रॅक्‍चर केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like