India Corona Update : चोवीस तासांत देशात 41,965 तर, केरळमध्ये 30,203 नवे कोरोना बाधित

एमपीसी न्यूज – देशात मागील 24 तासांत 41 हजार 965 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकट्या केरळमध्ये 30 हजार 203 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर, 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 28 लाख 10 हजार 845 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 19 लाख 93 हजार 644 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 33 हजार 964 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात सध्या 3 लाख 78 हजार 181 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, भारतात आजवर 4 लाख 39 हजार 020 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.50 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 52 कोटी 31 लाख 84 हजार 293 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 16 लाख 06 हजार 785 नमूने तपासण्यात आले आहेत.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत देशात 65 कोटी 43 लाख 13 हजार 508 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात विक्रमी 1 कोटी 33 लाख 18 हजार 718 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.