23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Mumbai News : सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज: टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स या संस्थेने केलेल्या जागतिक वाहतूक सर्वेक्षणात मुंबई हे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेले दुसऱ्या क्रमांकावरील शहर ठरले आहे. संस्थेने 2020 मधील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांची यादी त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या यादीत रशियातील मॉस्को हे पहिल्या क्रमांकावर आहे. हे सर्वेक्षण सहा खंडांमधील 57 देशांतील 416 शहरांमध्ये केले गेले आहे.

संस्थेने जाहीर केलेल्या या सर्वेक्षणात बॅंगलोर सहाव्या स्थानी असून, नवी दिल्ली व पुणे हे अनुक्रमे आठव्या व सोळाव्या स्थानावर आहेत. मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असूनदेखील मुंबईमधील वाहतूक कोंडी ही 2019 च्या तुलनेत 12 टक्क्यांनी घटली आहे. बॅंगलोर, नवी दिल्ली व पुण्यातील वाहतूक कोंडी हीदेखील अनुक्रमे 20, 09 व 17 टक्क्यांनी घटली आहे.

2019 मध्ये बॅंगलोर पहिल्या स्थानांवर असून मुंबई चौथ्या स्थानांवर होती. नवी दिल्लीने मात्र दोन्ही वर्षात आठवे स्थान कायम ठेवले आहे. पुणे शहराने मात्र चांगलीच सुधारणा केली आहे. 2019 मध्ये पाचव्या स्थानावर असलेले पुणे 2020 मध्ये सोळाव्या स्थानी गेले आहे.

spot_img
Latest news
Related news