Talegaon Dabhade News : नवीन समर्थ विद्यालयात लायन्स लायब्ररीचे उदघाटन

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ लोणावळा, लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालयात लायब्ररी उभारण्यात आली आहे. या लायब्ररीचा उदघाटन सोहळा शुक्रवारी (दि. 17) पार पडला.

त्यानिमित्ताने लायन्स क्लबने विद्यालयास शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील असे अनेक उत्तमोत्तम, दर्जेदार ग्रंथ भेट दिले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमिला वाळुंज होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लायन विजया खंडेलवाल यांनी ग्रंथालयाचे उद्घाटन केले. सर्व पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी पाहुण्यांच्या समोर परिपाठ सादर केला. ईशस्तवन व स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाच्या संस्कृत अध्यापिका प्रभा काळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचा शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा यांनी  स्वागत व सत्कार केला.

विद्यालयाचे पालक सदस्य राजेश म्हस्के, लायन विजया खंडेलवाल, लायन डॉक्टर हिरालाल खंडेलवाल, लायन दीपक बाळसराफ, लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रमिला वाळुंज यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि ग्रंथालयाचे महत्व सांगितले.  रेवप्पा शितोळे  व  प्रभा काळे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.शाळेचे मुख्याध्यापक कैलास पारधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा, शाळेचे मुख्याध्यापक कैलास पारधी, पर्यवेक्षक  वाजे सर,ज्येष्ठ गणित अध्यापक सुदाम वाळुंज,ग्रंथालय प्रमुख सोनल गायकवाड मॅडम व सर्व शिक्षक,सेवक, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संजय ऊर्फ बाळा भेगडे व सचिव संतोष खांडगे साहेब यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.