India Corona Update : चोवीस तासांत 44,877 नवे कोरोना रुग्ण, 1,15,591 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 44 हजार 877 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तर 1 लाख 15 हजार 591 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट घटून 3.17 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 26 लाख 31 हजार 421 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 15 लाख 85 हजार 711 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.54 टक्के एवढा झाला आहे.

 

देशातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या घटली असून, सध्या देशात 5 लाख 37 हजार 045 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 684 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात आजवर 5 लाख 08 हजार 665 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 75.07 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 14.15 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 172 कोटी 75 लाख 95 हजार 995 जणांना लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.