India Corona Update: चिंता वाढली! 24 तासांत 9987 नवे कोरोनाबाधित तर 332 जणांचा मृत्यू

India Corona Update: In 24 hours, 9987 new coronavirus cases and 332 people died देश अनलॉक होतानाच देशात दररोज जवळपास 10 हजार कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे.

एमपीसी न्यूज- दिवसेंदिवस देशातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेत भर घालत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज नऊ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशामध्ये 9 हजार 987 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर तब्बल 332 जणांचा मृत्यू झाला आहे.

देश अनलॉक होतानाच देशात दररोज जवळपास 10 हजार कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख 66 हजार 598 झाली आहे.

त्यापैकी 1 लाख 29 हजार 215 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 48.49 टक्के आहे. सध्या एक लाख 29 हजार 917 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 331 रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या 7 हजार 466 वर पोहोचली आहे.

पाच महत्त्वाचे मुद्दे

* चीनला मागे टाकत महाराष्ट्रात सर्वाधिक 88,000 रूग्णांची नोंद झाली असून आजवर 3169 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

* दिल्ली आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा दररोज झपाट्याने रुग्णांची वाढ होत आहे. तमिळनाडू मध्ये 33229 तर दिल्लीमध्ये 30,000 रुग्ण आढळून आले आहेत

* देशात आजवर 49,16,116 एवढ्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

* कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशात भारत पाचव्या स्थानावर आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूची जगातील स्थिती अत्यंत खराब होत चालली असल्याचे सांगितले असून सध्य परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात याचा आणखी उद्रेक होण्याची शंका व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.