India vs England Odi Series : टीम इंडिया पुण्यात दाखल

एमपीसी :  टी 20 मालिका जिकून आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या वनडे मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सीरिजसाठी इंडिया टीम पुण्यात दाखल झाली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने टीम इंडिया पुण्याला पोहचल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

23 मार्चपासून एकदिवसीय मालिका

उभय संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तिनही सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मालिकेला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील अखेरची मालिका

इंग्लंड संघाची भारत दौऱ्यामधील ही शेवटची मालिका असणार आहे. भारताने याआधी इंग्लंडला कसोटी आणि टी 20 मालिकेत पराभूत केलं आहे. त्यामुळे ही एकदिवसीय मालिका जिंकण्याचा मानस पाहुण्या इंग्लंडचा असणार आहे. तर ही वनडे मालिका जिंकून तिन्ही फॉर्मेटमध्ये इंग्लंडला पराभूत करण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे. दरम्यान नुकतीच या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची 14 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 3 राखीव खेळाडूंचा समावेश आहे.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.