Tokyo Olympic : भारतीय लष्कराच्या नाविक खेळाडूची टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड

एमपीसी न्यूज : ओमानच्या एआय मुसनाह स्पोर्ट्स सिटी येथे नुकत्याच पार पडलेल्या मुसाना खुल्या विजेतेपद स्पर्धेत  मुंबईस्थित आर्मी याटींग नोडच्या सुभेदार विष्णू सारावननने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी त्यांच्या थायलंड आणि चीनच्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मात देत स्पर्धा जिंकली.

दहा फ्लीट आणि पदक शर्यतीच्या चुरशीच्या स्पर्धेत, मद्रास इंजिनिअर्स ग्रुपच्या नाविकांनी लेझर स्टँडर्ड क्लासमध्ये रौप्य पदक जिंकले आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरीत स्थान प्राप्त केले.

विष्णू सारावनन हे सध्या भारतीय लष्कराच्या “मिशन ऑलिम्पिक” कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेत आहेत.  22 वर्षाचे कनिष्ठ कमिशन अधिकारी, आगामी काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.