_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

India’s First Covid-19 Vaccine: ‘कोवॅक्सिन’ ला मानवी चाचणीसाठी परवानगी

India's first Covid-19 vaccine : 'Covaxin' allowed for human testing आयसीएमआर आणि एनआयव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक यांनी 'कोवॅक्सिन' नावाची लस विकसित केली आहे. 'कोवॅक्सिन' लशीची चाचणी मानवावर करण्यास परवानगी मिळाली आहे.

एमपीसी न्यूज – भारतातील प्रथम स्वदेशी कोविड -19 लस ‘कोवॅक्सिन’ची मानवावर चाचणी घेण्यास भारतीय औषधाचे महानियंत्रकांनी (डीसीजीआय) परवानगी दिली आहे. हैद्राबाद येथील ‘भारत बायोटेक’ने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोवाक्सिन’ नावाची ही लस विकसित केली आहे.

या लसीच्या मानवी चाचणीचा पहिला व दुसरा टप्पा जुलै महिन्यापासून देशात सुरू होणार आहे. या लसीच्या विकासात आयसीएमआर आणि एनआयव्हीचे सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना संक्रमणाविरूद्ध लस देण्यासाठी अद्याप कोणत्याही लसीचा शोध लागलेला नाही. त्याच वेळी, कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत देशातील पाच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशातील आतापर्यंत 5 लाख 48 हजार 318 लोकांमध्ये कोरोना संसर्गाची पुष्टी झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन लाखांहून अधिक अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दोन लाखांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार घेत आहेत. आतापर्यंत 16 हजार कोरोनाबाधितांनी प्राण गमावले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.