Bhosari News : आधुनिक तंत्रज्ञानानुसार उद्योगाचा विकास करावा – अभय भोर

एमपीसी न्यूज – जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगाचा विकास करावा, असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर म्हणाले. भोसरी एमआयडीसी येथे गुरूवारी (दि.06) झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

अभय भोर म्हणाले, ‘शासनाचा ई- व्हेईकल धोरणाचा ऑटोमोबाईल क्षेत्रातील लघु उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योजकांनी इलेक्ट्रिकल व्हेईकल उत्पादनावर भर द्यावा आणि येणाऱ्या स्पर्धेला तोंड द्यावे. रोबो टेक्नॉलॉजी, थ्रीडी पेंटिंग, वेल्डिंग मशीन यामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. हे बदल आत्मसात केल्यास आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक मशिनरीचे प्रशिक्षण दिल्यास या नवीन तंत्रज्ञानाने जागतिक स्पर्धेला उद्योजक तोंड देऊ शकतात.’

उद्योजकांनी येणाऱ्या नवीन धोरणाला सामोरे जाऊन आपल्या उद्योग व्यवसायामध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.