Government fraud : खोटे शिक्के वापरून मिळवले 290 गावांचे वारस प्रमाणपत्र, बारा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : न्यायालयाचे बनावट शिक्के तयार करून त्याद्वारे 54 गावांऐवजी 290 गावांची खोटी वारस प्रमाणपत्र तयार करून त्यावर स्वतःची वारस म्हणून नोंद करून घेत शासनाची फसवणूक केली.(Government fraud) हा प्रकार 14 मार्च 2019 रोजी तलाठी कार्यालय देहू येथे घडला.

महेश भिकाजी नलावडे (वय 42, रा. निगडी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 1) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रताप भबुतमल मारवाडी, विनोद भबुतमल मारवाडी, दोन महिला, तुषार दत्तात्रय झेंडे, महेंद्र साहेबराव झेंडे, तत्कालीन देहूगाव तलाठी, मंडल अधिकारी शेखर शिंदे, प्रमोद राजाराम शिंदे, देविदास लक्ष्मण पवळे, अतुल ज्ञानेश्वर थिटे, अमर वसंत कोंढारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Senior citizen fraud : ज्येष्ठ नागरिकाची चिटफंड कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने 80 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव सर्वे नंबर 97/1, 121/4 फेरफार क्रमांक 1355 यावर तलाठी कार्यालय देहू येथे आरोपींनी तलाठी आणि सर्कल यांच्याशी हातमिळवणी (Government fraud) करून न्यायालयाचे खोटे शिक्के तयार केले. 54 गावांऐवजी 290 गावांची खोटी वारस प्रमाणपत्र तयार करून त्यावर स्वतःची वारस नोंद करून घेत शासनाची फसवणूक केली. त्या दस्तांवर सही घेऊन ती जागा विक्री व खरेदी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.