Pimpri News : झेप रिहॅबिलिटेशन सेंटर मधील बौद्धिक अक्षम (दिव्यांग) विद्यार्थ्यांनी घेतला मेट्रो सफरचा आनंद

एमपीसी न्यूज – माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या पुढाकाराने झेप रिहॅबिलिटेशन सेंटर मधील 40 (बौद्धिक अक्षम) विद्यार्थासह झेप मधील शिक्षकांना पिंपरी ते फुगेवाडी ते पिंपरी अशी मेट्रो सफर घडवुन आणली. या मेट्रो सफरमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवासाचा मनमुराद आनंद घेतला. मेट्रो सफर करताना या मुलांच्या चेहऱ्यावर विलक्षण कुतुहल दिसून येत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात पिंपरी ते फुगेवाडी असा मेट्रो मार्ग सुरु करण्यात आलेला आहे. या मेट्रोतून सफर करणे कुतुहलाचा विषय झाला आहे. आजतागायत या मेट्रो मार्गातून जेष्ठ नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी तसेच तृतीय पंथीय यांना मेट्रो सफर घडविण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेऊन त्यांना मेट्रो सफर घडवून आणली. परंतु, माजी नगरसेविका चिंचवडे यांच्या पुढाकाराने झेप रिहॅबिलिटेशन सेंटर मधील 40 (बौद्धिक अक्षम) विद्यार्थासह झेप मधील शिक्षकांना पिंपरी ते फुगेवाडी ते पिंपरी अशी मेट्रो सफर घडवून आणली. या मेट्रो सफरमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रवासाचा मनमुराद आनंद घेतला. मेट्रो सफर करताना या मुलांच्या चेहऱ्यावर विलक्षण कुतुहल दिसून येत होते.

सर्व सामान्यांना मेट्रोतून प्रवास करणे सहज शक्य असते. परंतु, अशा बौद्धिक अक्षम मुलांना मेट्रोतुन प्रवास घडवुन आणणे हे फार जिकरीचे होते. ही सफर यशस्वी करण्यासाठी झेप रिहॅबिलिटेशन सेंटरच्या संस्थापक सचिव नेत्रा पाटकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच डी.वाय. पाटील कॉलेजचे विद्यार्थी यांनी महत्वपूर्ण भुमिका बजावली. विशेषत: या विशेष मुलांच्या मेट्रो सफरीसाठी पिंपरी येथील स्टेशन कंट्रोलर शुभांगी जाधव, फुगेवाडी येथील स्टेशन कंट्रोलर श्रावणी जाधव, सुरक्षा प्रमुख सुनील पाटील, मेट्रोचा सर्व कर्मचारी वर्ग व रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे डायरेक्टर सुधीर मरळ यांनी मोलाचे सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.