IPL 2020: ठरलं! 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर रंगणार आयपीएलचा तेरावा हंगाम

IPL 2020: The thirteenth season of IPL will be played from September 19 to November 10 आयपीएल सामन्यांच्या वेळेत आमूलाग्र बदल करण्यात आला असून सर्व सामने हे रात्री साडेसात वाजता सुरु करण्यात येणार आहेत.

एमपीसी न्यूज – गव्हर्निंग काऊन्सिलच्या रविवारी झालेल्या बैठकीत आयपीएलच्या तेराव्या हंगामाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवण्यात येणार असल्याचं नक्की करण्यात आले आहे. अद्याप केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी येणं बाकी असलं तरीही येत्या काही दिवसांत ही परवानगी मिळेल अशी माहिती गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे.

बीसीसीआयने 20 ऑगस्टआधी कोणताही संघ युएईला रवाना होणार नाही अशी सूचना संघमालकांना दिली आहे. आठ नोव्हेंबर रोजी होणारी आयपीएलची फायनल आता दहा नोव्हेंबरला होणार असल्यामुळे 51 दिवसांचा आयपीएल कालावधी आता 53 दिवसांचा झाला आहे.

आयपीएल सामन्यांच्या वेळेत आमूलाग्र बदल करण्यात आला असून सर्व सामने हे रात्री साडेसात वाजता सुरु करण्यात येणार आहेत. तसेच, ज्या दिवशी डबल हेडर सामने असतील त्या दिवशी दुपारचा सामना हा साडेतीन वाजता सुरु करण्यात येणार आहे.

दरम्यान, तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा 8 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंत, कोरोनामुळे तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळावा यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून 8 ऐवजी 10 नोव्हेंबर करण्यात आली असल्याचे माहिती समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.