IPL 2023 – रवी शास्त्री आणि केविन पीटरसन यांची के एल राहुलवर टीका

एमपीसी न्यूज – आयपीएलच्या आधी आणि आयपीएलमध्ये के एल राहुल हा (IPL 2023) खराब कामगिरीने त्रासेलेला आहे. भलेही तो धावा काढत असला तरी त्याला आयपीएल मध्ये हवी ती धावगती ठेवता येत नाहीये. राहुलने मागच्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध 32 चेंडूंमध्ये फक्त 39 धावा काढल्या. या अगोदर चेन्नई सुपर किंगजविरुद्ध पण त्याने 18 चेंडूंमध्ये फक्त 20 धावा काढल्या होत्या. आयपीएलच्या आधी सुद्धा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खराब पराक्रमामुळे त्याला प्रेक्षकांकडून सोशल मीडिया वर बऱ्याच वाईट प्रतिक्रियांचा सामना करायला लागला होता.

राहुलची क्रिकेटच्या फटाक्यांची निवड बरोबर नाही असे बरेच जणांचे म्हणणे आहे. त्यावरून तो सलामी फलंदाज असल्यामुळे त्याला पॉवर प्लेमध्ये तुफानी आणि ताबडतोब फलंदाजी करणे भाग आहे. परंतु, तो फारच जपून खेळायचा प्रयत्न करतो. आयपीएल सामन्याची टिप्पणी करताना इंग्लंड चा माजी कर्णधार केविन पीटरसन म्हणाला, ” केएल राहुलची फलंदाजी पाहणे ही माझ्यासाठी आजवरची सर्वात कंटाळवाणी गोष्ट आहे”.

Pune : ‘चौक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना भावला

जेव्हा माझी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री याना विचारले की राहुल ने धावगती वाढवून फलंदाजी करावी का तेव्हा शास्त्री म्हणाले , ” पूर्णपणे आवश्यक आहे. जे सर्व 160 बद्दल बोलतात, मी ते मानत नाही. जेव्हा तुमच्याकडे (IPL 2023) दोन संधी असतात, जर तुम्ही त्या 39 धावांचे चे 60 किंवा 70 धावांमध्ये मध्ये रूपांतर केले तर 160 धावांचे चे 175 धावा होतील. तुम्हाला ती मोठी धावसंख्या मिळण्यासाठी पहिल्या तीन फलंदाजांमध्ये कोणीतरी हवे आहे.”

के एल राहुल हा भरपूर प्रतिभावान खेळाडू आहेत. त्याचा फॉर्म खराब आहे परंतु एकदाचा त्याला फॉर्म भेटला की तो चांगली कामगिरी करेल असा विश्वास प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आहे. त्यासाठी के एल राहुल ने स्वतःची मानसिकता व फलंदाजी करताना फटके खेळण्याची पद्धत बदलावी त्याचाने तो परत जुना के एल राहुल आपल्याला बघायला मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.